Coronavirus Update: देशात कोरोना रुग्णांनी पार केला 18 लाखाचा टप्पा; 24 तासात 52,972 नवे कोरोनाबाधित, पहा पुर्ण आकडेवारी
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) माहितीनुसार देशात मागील 24 तासात कोरोनाचे 52,972 नवे रुग्ण आढळुन आले आहेत. यानुसार सद्य घडीला देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 18 लाख 03 हजार आणि 696 वर पोहचली आहे. याशिवाय मागील 24 तासात एकुण 771 मृत्युंची नोंंद झाली असुन आजवर देशात कोरोनामुळे बळी गेलेल्यांंची संख्या 38,135 इतकी झाली आहे. सध्या देशात एकुण 5,79,357 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन आजवर 1,186,203 जणांंनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात सध्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (Coronavirus Recovery Rate) 65.44% वर पोहचला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीची आणि मृतांची सरासरी पाहिल्यास 96.84% : 3.16% अशी टक्केवारी आहे.

दुसरीकडे आयसीएमआर च्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या चाचण्यांनी सुद्धा 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. आजवर, देशात एकुण 2,02,02,858 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असुन यातील 3,81,027 टेस्ट तर मागील 24 तासात पार पडल्या आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) तर्फे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड 19च्या लसीची फेज 2 आणि 3 मधील मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.