Coronavirus Update: देशात कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 65.44 टक्के- आरोग्य मंंत्रालय
Coronavirus (Photo Credits: PTI)

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus In India) संख्येने 17 लाखांचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासात 54 हजार 736 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे. या सगळ्या वाढत्या आकडेवारीत एक दिलासादायक माहिती सध्या आरोग्य मंंत्रालयाकडुन (Health Ministry) देण्यात येत आहे ती म्हणजे, देशात सध्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (Coronavirus Recovery Rate) 65.44% वर पोहचला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीची आणि मृतांची सरासरी पाहिल्यास 96.84% : 3.16% अशी टक्के वारी आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या देशात 5 लाख 67 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 11 लाख 45 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (हेही वाचा - अवघ्या 30 सेकंदात मिळेल Coronavirus Test चा रिझल्ट; कोरोना टेस्टिंगसाठी 4 तंत्रांची ट्रायल करत आहेत भारत व इस्त्राईल)

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणार्‍या महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती बरीच आटोक्यात येत आहे. महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या माहिती नुसार आतापर्यंत 2 लाख 66 हजार 883 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 61.81  टक्के आहे. तर सध्या 1 लाख 49 हजार 214 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

ANI ट्विट

दरम्यान देशात कोरोना च्या चाचण्यांंचे आकडे सुद्धा वाढवण्यात आले आहे. आयसीएमआर च्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट पर्यंत देशात कोरोनाच्या 1,98,21,831 चाचण्या पार पडल्या आहेत. यापैकी 4,63,172 चाचण्या या कालच्या दिवसात घेण्यात आल्या आहेत.