Coronavirus Update: भारतीय सीमा सुरक्षा दलात 43 नवे कोरोना रुग्ण; एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 911 वर
Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतीय सीमा सुरक्षा दलात (BSF)  मागील 24 तासात कोरोनाचे 43 नवे रुग्ण आढळुन आले आहेत. यानुसार भारतीय सैन्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 911 वर पोहचला आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सैन्यातील तब्बल 633 रुग्णांंनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे संपूर्ण भारतात (India) काल (26 जून) दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 384 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे तर आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) माहिती दिली आहे. देशभरातील कोरोनाचे अपडेट्स जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा 

देशात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना सैन्यावर परकीय आक्रमणांचा देखील तितकाच तणाव आहे. जम्मू काश्मीर मध्ये मागील काही आठवड्यात वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत, तर भारत चीन सीमारेषेवर गलवान व्हॅली मध्ये सुद्धा अधिक सैन्य तैनात करण्यात आल्याने एकूणच कामाचा ताण वाढत आहे. Jammu-Kashmir: अनंतनागमध्ये CRPF टीमवर दहशतवादी हल्ला; सीआरपीएफचा एक जवान शाहिद, 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

ANI ट्विट

भारतात आता कोरोनाच्या रुग्ण संख्येने हाफ मिलियन म्हणजेच 5 लाखाचा टप्पा ओलांडला असल्याने उद्या म्हणजेच 28 जून रोजी महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून काय संवाद साधतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.