आसाममध्ये आज कोविड-19 चे 61 नवे रुग्ण; 95 जणांची कोरोनावर मात ; 25 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Dec 26, 2020 12:00 AM IST
आज ख्रिस्ती धर्मियांसाठी मोठा दिवस असून नाताळचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसह प्रभू येशूकडे प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा व्यक्त करताना दिसून येतील. आनंद आणि उत्साहाने भरलेला हा सण प्रत्येकजणाने अत्यंत साधेपणाने आणि घरच्या घरी साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही ठिणाकी रात्रीच्या वेळेस संचार बंदी ही लागू करण्यात आली आहे. केरळ, गोवा, महाराष्ट्र, दिल्ली सारख्या शहरातील चर्चमध्ये क्रिसमस निमित्त मोठी रोषणाई पहायला मिळाली. तसेच मोजक्याच संख्येच्या उपस्थितीने ख्रिस्ती धर्मियांनी मास्क घालून प्रार्थनेला हजेरी लावली.
दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरुच आहे. तर शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करुन त्यावर तोडगा काढावा असे स्पष्ट केले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये बैठका पार पडत आहे. परंतु या बैठकीतून ही काही निष्पन्न झालेले नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपी कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होत आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केले जाऊ लागले आहे. नोएडा आणि गाझियाबाद येथून दिल्लीत येणाऱ्या वाहतूकीसाठी चीला, गाझिपूर बॉर्डर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकदारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या रुपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनावरील लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुवीर, या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात युनायटेड किंगडम येथे 60 हजारांहून अधिक नागरिकांना फायझर बायोटेक कोविड19 ची लस देण्यात आली आहे. याबद्दल रॉयटर्सने ब्रिटीश सरकारच्या रिपोर्ट्स मध्ये म्हटले आहे.