कोविड 19 च्या भारतामधील दुसर्‍या लाटेमध्ये वयोवृद्धांसोबत ऐन तारूण्यातील देखील अनेक मंडळी मृत्यूमुखी पडली. मीरत मध्ये अशीच 24 वर्षीय जुळी भावंडं कोविड 19 चा सामना करता करता हे जग सोडून गेल्याची क्लेषकारक घटना समोर आली आहे. Indianexpress च्या रिपोर्टनुसार, 13 मे दिवशी Gregory Raymond Raphael आणि त्यांची पत्नी Soja यांना त्यांचा 24 वर्षीय मुलगा Joefred Varghese Gregory याचे कोरोनामुळे निधन झाल्याचं फोन हॉस्पिटलमधून आला. दरम्यान Joefred चा जुळा भाऊ Ralphred देखील त्याच हॉस्पिटलमध्ये कोविड 19 वर उपचार घेत होता. जेव्हा आईसोबत बोलताना Ralphred ला समजलं की त्याच्या भावाचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे तेव्हा त्याने देखील तासाभरात प्राण सोडले.

Joefred आणि Ralphred यांच्या जन्मामध्ये अवघ्या 3 मिनिटांचं अंतर होतं. दोन्ही भाऊ कुटुंबाच्या जवळ राहणारे, कष्टाळू होते. पण त्याच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान 23 एप्रिलला Joefred आणि Ralphred यांना ताप येऊ लागला. त्यानंतर काही दिवस त्यांनी घरीच औषधोपचार केले पण त्यांची स्थिती सुधारत नव्हती. 1 मे च्या जवळ दोघांनाही रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने Anand Hospital मध्ये दाखल करण्यात आले. नंतर व्हेंटिलेटर सपोर्ट आणि आयसीयू मध्ये त्यांना ठेवण्यात आले. 10 मे दिवशी दोघेही कोविड निगेटीव्ह झाले पण पुढे 3 दिवसांतच होत्याचं नव्हतं झालं. Joefred च्या निधनाचं वृत्त समजलं आणि त्याच्या आईला हे जर Ralphred ला समजलं तर तो हा धक्का पचवू शकणार नाही हे समजत होतं. नियतीच्या मनातील ही गोष्ट वास्तवातील घडली आणि ते दोघेही मृत्यूमुखी पडले. (नक्की वाचा: Dr KK Aggarwal Passes Away: IMA चे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन).

दरम्यान Joefred आणि Ralphred यांनी Karunya University,Coimbatore मधून बी टेकचे शिक्षण घेतलं होते. नंतर अंतिम वर्षाला असताना त्यांना नोकरी मिळाली. Joefred हा Accenture Pvt Ltd मध्ये काम करत होता तर Ralphred हा Hyundai Mubis Company ला नोकरीला होता. दरम्यान Joefred या काळात मीरत मध्ये वर्क फ्रॉम होम करत होता तर Ralphred त्याच्या हाताला दुखापत झाली म्हणून हैदराबाद मधून घरी परतला होता. पण या कोविड ने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.