दिल्ली: लिफ्टच्या बहाण्याने कॅबमध्ये बसलेल्या तृतीयपंथीयावर गोळीबार, सेक्सला नकार दिल्याने हल्ला झाल्याचा संशय
Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरने (Cab Driver) तृतीयपंथीयावर (Transgender) गोळी झाडल्याची धक्कादायक घटना दिल्लीतून समोर येत आहे. ही घटना दिल्लीतील हजरत निझामुद्दीन भागात घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी कॅब ड्रायव्हरला अटक करण्यात आले आहे. सेक्सला नकार दिल्याने हा केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.

आरोपीचे नाव सागर असून तो शाशी गार्डन, त्रिलोकपुरी (Trilokpuri) येथील रहिवासी आहे. सुंदर भाती याच्या गुन्हेगारी गँगचा हा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना जानेवारी 19-20 च्या रात्री बारापुल्ला फ्लायओव्हर (Barapullah flyover) जवळ घडली. त्यानंतर पीडित तृतीयपंथीयाला एम्स (AIIMS Trauma Centre) येथे दाखल करण्यात आले. शरीरातून गोळी काढण्यात आली असली तरी त्याची अवस्था गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांना आरोपीला पकडण्यात यश आले. मुलगी समजून तृतीयपंथीयाला कॅबमध्ये लिफ्ट दिली. मात्र त्यानंतर तो तृतीयपंथीय असल्याचे समजताच त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे.

हजरत निझामुद्दीन पोलिस स्टेशनात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मॉय बिस्वाल (Chinmoy Biswal) यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.