देशात लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यामुळे रोजंदारीवर पोटाची खळगी भरणा-या स्थलांतरित मजूरांची घरचा रस्ता धरला आहे. अनेक मजूर पायी आपल्या घरच्या दिशेने निघाले आहेत तर काही रस्त्यात मिळेल त्या वाहनांमधून प्रवास सुरु केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये (UP) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रकमधून आपल्या घरी निघालेल्या मजूरांवर रस्त्यातच काळाने घाला घातला. दोन ट्रकच्या भीषण अपघातात मिहौली राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या 23 मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या औरैया मधील ही घटना आहे. सकाळी 3 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना त्वरित जवळी रुग्णालयात नेण्यात आले.
ट्रक मधील असणारे लोक हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. लॉकडाऊन दरम्यान झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात सांगितला जात आहे. औरंगाबाद: करमाड येथे झालेल्या 16 मजूरांच्या मृत्यूची काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगतोय प्रत्यक्षदर्शी, नेमके काय घडलं?
24 people were brought dead, 22 have been admitted & 15 who were critically injured have been referred to Saifai PGI. They were going to Bihar & Jharkhand from Rajasthan: Archana Srivastava, Chief Medical Officer (CMO) Auraiya https://t.co/YKsoS6Jit6 pic.twitter.com/W9FZKYvjHl
— ANI UP (@ANINewsUP) May 16, 2020
आतापर्यंत मिळालेल्या बातमीनुसार, तेथील स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रिपोर्टनुसार, ट्रकमध्ये असणारे बहुतांश लोक हे यूपीच्या फरीदाबादहून गोरखपूर कडे जात होते. लॉकडाऊन मध्ये आतापर्यंत 13.5 लाख प्रवासी श्रमिक आणि कामगार रेल्वे, बस आणि अन्य वाहनांनी आपल्या घरी पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) मधील करमाड (Karmad) जवळ मोठा अपघात झाला. पहाटे 5.15 च्या सुमारास रिकाम्या मालगाडीने काही लोकांना जालना-औरंगाबाद दरम्यान उडवले. यात स्थलांतरीत 14 मजूर ठार झाले.