Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

असम येथे आज आणखी 169 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 23 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Nov 23, 2020 11:37 PM IST
A+
A-
23 Nov, 23:37 (IST)

असम येथे आज आणखी 169 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 11 हजार  682 वर पोहचली आहे. ट्विट-

 

23 Nov, 22:41 (IST)

केरळ: एका मुलीवर चाकूने वार करुन ठार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

23 Nov, 21:42 (IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जमील शेख यांची ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. ट्विट-

 

23 Nov, 21:24 (IST)

असमचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले दुःख. मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आसामच्या विकास प्रक्रियेत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे आसामने तसेच देशाने एक अनुभवसंपन्न व अभ्यासू नेता गमावला, असे ते म्हणाले आहेत. ट्वीट-

 

23 Nov, 20:51 (IST)

सुरक्षा परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी सेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत.

23 Nov, 20:36 (IST)

Actor Kangana Ranaut Property Demolition प्रकरणात बॉम्बे हायकोर्ट 27 नोव्हेंबर रोजी निकाल देणार आहे.

23 Nov, 20:09 (IST)

आज राज्यात कोविड-19 चे 4,153 नवे रुग्ण आढळून आले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,729 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 17,84,361 वर पोहचला आहे. त्यापैकी 81,902 अॅक्टीव्ह रुग्ण असून 16,54,793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 46,653 मृतांची नोंद झाली आहे.

23 Nov, 19:28 (IST)

मुंबई: स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या नावाने 30 वेगवेगळ्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन वापरुन 2100 कोटी पेक्षा अधिक फेक इनव्हॉयसेस बनवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून 5 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.

23 Nov, 18:53 (IST)

कर्नाटक मध्ये आज कोविड-19 चे 1,509 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,645 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

23 Nov, 18:15 (IST)

Former Assam CM Tarun Gogoi Passes Away: आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ही माहिती दिली.

Load More

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायसस धोका, काळजी आणि नियम यांची आठवण करुन देत राज्यातील जनतेला पुन्हा एकदा संबोधित केले आहे. या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका टळला नाही. त्यामुळे गाफील न राहता पुन्हा योग्य ती काळजी घेत सर्व नियम आणि अटी पाळण्याचे नागरिकांना अवाहन केले. दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरस संसर्गाची पुन्हा एकदा दुसरी लाट येते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनेही याबाबत गंभीर दखल घेतल असून, एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेश उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, आयुष मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन शस्त्रक्रिया करण्यास परवाणगी देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश आयुष मंत्रालयाच्या भारतीय वैद्यक परिषद (काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) यांनी नुकताच काढला. दरम्यान, या आदेशावरुन काही प्रमाणात स्वागत तर काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. आयुर्वेदातील डॉक्टरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतू, आयएमए आणि एमएमसी या दोन्ही संघटनांनी आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाबाब नाराजी व्यक्त केली आहे.

खरेतर दिवाळी आणि त्यानंतरचा काही काळ हा थंडीचा कालावधी. जो हिवाळा म्हणून ओळखला जातो. परंतू, गेल्या काही काळापासून निसर्गाचे चक्रच असे काही उलटेपालटे फिरले आहे की, ज्यामुळे वेळेवर काहीच घडताना दिसत नाही. ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस. कधी पावसाळ्यात थंडी तर थंडीत गर्मी असे विचित्रसे काही पाहायला मिळत आहे. हिवाळा ऋतू सुरु असला तरी राज्यात अद्यापपर्यंत म्हणावी तशी थंडी अनेक ठिकाणी पाहायाल मिळत नाही. प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात थंडी पाहायला मिळत नाही. अपेक्षित थंडीला अद्यापही काही दिवस वाटच पाहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

एका बाजूला थंडी गायब झाली असताना दुसऱ्या बाजूला मराठवाडा, विदर्भ आदी प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये रात्रीच्या वेळी तापमानात बऱ्याच प्रमाणात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोकण विभागात तापमान सरासरी गाठताना दिसत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now