छत्तीसगड मध्ये आज 557 कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा मृत्यू; 23 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Aug 23, 2020 11:55 PM IST
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल गणेश चतुर्थी दिवशी बाप्पांचे घरोघरी, मंडळात आगमन झाले आहे. आज दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी. महाराष्ट्रात ऋषीपंचमी निमित्त अनेक महिला उपवास धरतात. पूजा करतात. दरम्यान कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात आहे. सणाला साधे स्वरुप प्राप्त झाले असले तरी गणपती बाप्पाच्या येण्याने सर्वत्र आनंद पसरला आहे.
देशासह राज्यात कोरोना विषाणूंचे संकट कायम आहे. कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यूदरही कमी झाला आहे. जगातील सर्वात चांगला रिकव्हरी रेट आणि सर्वात कमी मृत्यू दर भारताचा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
आरोग्य मंत्रालयाने दिले्लया माहितीनुसार, सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2,97,5701 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,97,330 जणांवर सध्या उपचार सुरु असून 2,22,2577 रुग्णंनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर देशातील मृतांचा आकडा 55,794 इतका आहे. दरम्यान देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून जनजीवनाची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे.