आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला. गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. सामान्य जनतेच्या हाताला मात्र काहीही लागलं नाही. भाजपवाले आणि नरेंद्र मोदी कधीही महागाईवर बोलत नाहीत. कधी शेकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. शेतीमालाला भाव नाही. तरुणांना रोजगार नाही, अशी परिस्थिती सध्या देशात असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. (हेही वाचा - Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, ते 24 तास त्या 22 लोकांना मदत करत असतात. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यातील लोक तुम्हाला सांगतील की मुख्य मुद्दा बेरोजगारी आणि महागाईचा आहे. ते म्हणाले आहेत की, ''तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे.''
माध्यमे तुम्हाला फक्त पंतप्रधान मोदींना समुद्राच्या तळाशी जाताना किंवा मंदिरात प्रार्थना करताना दाखवेल. प्रसारमाध्यमांना बेरोजगारी आणि महागाईशी काहीही देणेघेणे नाही. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, ''आम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे, आम्हाला तुमची मदत करायची आहे. नरेंद्र मोदी उद्योजकांना पैसे देऊ शकतात तर काँग्रेस गरीबांना पैसे देऊ शकते. त्यामुळे आम्ही 'महालक्ष्मी' हे नवीन धोरण आणत आहोत. आमचे सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देईल. तसेच आम्ही एका वर्षात महिलांना एकूण एक लाख रुपये देणार आहोत.''