पंजाबमधील किसान आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम; पश्चिम रेल्वेची माहिती; 21 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Dec 21, 2020 11:30 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी रविवारी संवाद साधला. या संवादानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून, पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विरोधक असा सामना पाहायाला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवादादरम्यान, मुंबई येथील कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेबाबतचा मुद्दा जनहीत डोळ्यासमोर ठेऊन सोडवायला हवा. त्यासाठी विरोधकांसोबतही आमची चर्चेची तयारी आहे. वेळ पडली तर त्याचे श्रेय आम्ही विरोधकांना द्यायला तयार आहोत, असे म्हटले. त्यावरुन रपाज्यातील भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
राज्यासह देशातील कोरोना व्हायरस नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच जगासमोर नवे आव्हान उभे ठाकताना पाहायला मिळत आहे. कारण इंग्लंड आणि इतर काही देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याच प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे जगाच्या चिंते पुन्हा एकदा नव्याने भर पडली आहे. अशात जगभरातील विविध देशांनी नववर्ष आणि नाताळ सणाला जमणारी गर्दी विचारात घेता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतात काय होणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही. मात्र, किमान पुढचे 6 महिने मास्क वापरणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सरत्या वर्षात आलेली मरगळ, कोरोनाने वाया घालवलेले दिवस या सर्व गोष्टी झटकून राज्यातील नागरीक नव्या उत्साहाने 2021 या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी रिसॉर्ट, कृषी पर्यटन आणि सहलिांना प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. अनेक रिसॉर्ट मालक, व्यवस्थापक सांगतात की नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट बूक करण्यास प्राधान्य देत आहेत. सामूहिक बुकींगही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिक 20 ते 25 जणांच्या समूह करुन बुकींग करण्यास प्राधान्य देत आहेत.
दुसऱ्या बाजूला देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशा या कडाक्याच्या थंडीतही राजधानी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी काद्याविरोधात हे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे अद्यापही धोका टळला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील बातम्या, घडामोडी यांबाबतचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.