इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिकेत अनेक भारतीय युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, या यादीत राजस्थानचा तडाखेबाज फलंदाज संजू सॅमसनचे नाव नसल्याने त्याच्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. 

चमोली जिल्ह्यातील तपोवन येथील धरणाच्या ढिगाऱ्याखाली आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत एकूण 67 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे. ट्वीट-

 

गुटख्याचे बेकादेशीर उत्पादन केल्याप्रकरणी मध्य दिल्लीच्या कर अधिका-यांनी एकाला अटक केली आहे.

नवी दिल्लीत 152 नव्या रुग्णांसह एकूण कोरोना बाधितांची संख्या 6,37,755 वर पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत भाजप राष्ट्रीय कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये शस्त्र आणि दारूच्या तस्करीच्या आरोपाखाली 5 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्विट-

 

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 6281 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,93,913 वर पोहोचली आहे.

कर्नाटकच्या बंगळरू येथे मुसळधार पाऊस कोसळला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ट्वीट-

 

जम्मू काश्मीरच्या बाराजुल्ला भागात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात 2 पोलीस जवान शहीद झाले. या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जम्मू काश्मीर पोलीस दहशतवाद्यांना नक्कीच धडा शिकवतील अशी मला खात्री आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. ट्वीट-

 

मुंबईत आज आणखी 897 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्वीट-

 

Load More

राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले असून मुंबईतही कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एनआयटीआय आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सहाव्या बैठकीचे अध्यक्षपद भुषवतील. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. यात कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादन, मानव संसाधन विकास, तळागाळातील सेवा वितरण आणि आरोग्य व पोषण या विषयावर चर्चा होईल.

पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग 12 व्या दिवशीही वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलचे दर 90.58 प्रति लीटर असून डिझेल 80.97 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. इंधनदरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरुन विरोधक पेटून उठले असून संबंधित मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.