पश्चिम बंगाल: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुर्गापूर येथून दिल्लीसाठी रवाना ; 20 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 20, 2020 11:43 PM IST
जगात जशी कोविड 19 लस उपलब्ध होत आहे तसं त्याचं लसीकरण सुरू झालं आहे. दरम्यान नुकतीच इस्त्राईल मध्ये देखील लसीकरण सुरू झाले असून ईस्त्राईलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी कोविड 19 ची लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांना लस टोचून त्यांनी देशामध्ये लसीकरणाला सुरूवात केली आहे. नुकतीच इस्त्राईलने देखील फायझर च्या लसीला मान्यता दिली होती. येत्या काही दिवसांत त्यांना 4 मिलियन डोस पुरवले जाणार आहेत.
ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली असली तरीही लॉकडाऊनमधून अद्याप देशाची सुटका झालेली नाही नुकतीच युके पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार लंडन सह ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे.
भारतामध्ये एकीकडे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कृषी कायद्या विरूद्ध मात्र शेतकरी आंदोलन कायम ठेवलं जात आहे. देशातील शेतकरी नव्या कृषी कायद्याला रद्द करण्यासाठी एकवटला आहे. आज दिल्ली-युपी बॉर्डरवर आंदोलक शेतकरी शहिद दिवस साजरा करणार आहेत. या आंदोलनामध्ये ज्यानी आपले प्राण दिले त्यांच्यासाठी आजचा दिवस असेल.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये कोरोनाची लाट आता ओसरली आहे. 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 20 हजारापेक्षा कमी आहे. केरळ आणि महाराष्ट्र मध्ये देशातील 40% रूग्ण आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.