सीमा सुरक्षा दलातील 2 जवानांचा कोविड 19 च्या संसर्गामुळे मृत्यू
Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) जवानाचा मृत्यू झाला आहे. BSF ने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या जवानाची प्रकृती अतिशय गंभीर होती. उपचारासाठी सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये (Super Speciality Clinic) दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत BSF च्या 2 जवानांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. यापूर्वी 3 मे रोजी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung hospital) दाखल असलेल्या कोरोनाग्रस्त जवानाचा मृत्यू झाला होता. Coronavirus: BSF च्या एकूण 67 जवानांना कोरोनाची लागण, पत्नी आणि मुलांचाही समावेश

3 मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जवानाची प्रकृती गंभीर झाल्याने 4 मे रोजी त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. या जवानाच्या मृत्यू नंतर पोस्टमार्टम दरम्यान त्याची कोविड 19 ची चाचणी पॉझिटीव्ह आली. BSF यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 41 बीएसएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्याचे काम सुरु झाले. संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून लक्षणे आढळलेल्यांची कोविड 19 ची टेस्ट करण्यात येणार आहे.

ANI Tweet:

Maharashtra Coronavirus: महाराष्ट्रात तब्बल ४८७ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण - Watch Video 

रिपोर्टनुसार, BSF मध्ये आतापर्यंत तब्बल 150 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी केवळ 2 जणच यातून पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. दरम्यान कोरोनाग्रस्त जवान आढळल्याने BSF चे दिल्लीमधील मुख्यालय 4 मे रोजी सील करण्यात आले होते. सॅनिटाझेशन प्रोसेसनंतर 6 मे रोजी मुख्यालय पुन्हा सुरु करण्यात आले.