BSF Recruitment (PHoto Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) हळूहळू करत सामान्य नागरिकांसह पोलिस, डॉक्टर आणि जवानांना देखील आपल्या विळख्यात घेत आहे. याची कल्पना या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ यावरून दिसून येईल. त्रिपुरा मध्ये 13 BSF जवानांना कोरोनाची बाधा झाली असून देशात एकूण 67 BSF जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्रिपुरा मध्ये आढळलेल्या 13 रुग्णांपैकी 10 BSF जवान, 3 जवानांच्या पत्नी आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.

तसेच यात दिल्लीत 41 BSF जवानांचा समावेश आहे. हा आकडा खूपच धक्दायक असल्याचे सांगण्यात येत आहे. COVID-19: दिल्लीत सशस्त्र सीमा दलाच्या 8 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात 12,974 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 548 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहेत. तर 2115 रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे.