Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
9 hours ago

पी चिदंबरम आणि मुलगा कार्ती यांच्यावर आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल; 2 जूनच्या 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Jun 02, 2020 11:35 PM IST
A+
A-
02 Jun, 23:35 (IST)

ईडीने (ED) कॉंग्रेस नेते पी चिदंबरम आणि मुलगा कार्ती यांच्यावर आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.

02 Jun, 22:54 (IST)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 3 जून रोजी केवळ 12 आगमन विमाने ऑपरेट करणार आहे. ही विमाने 10 सेक्टरसाठी 4 विमान कंपन्या- एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, गोएअर आणि स्पाइसजेट चालवतील.

02 Jun, 22:24 (IST)

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 22 मृत्यू आणि 308 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी मृतांचा आकडा 367 पर्यंत वाढला असून, एकूण पॉझिटिव्ह केसेस आता 8134 झाल्या आहेत.

 

02 Jun, 22:01 (IST)

निसर्ग चक्रीवादळामुळे इंडिगोने मुंबईहून आणि मुंबईयेणारी 17 विमाने रद्द केली आहेत. उद्या मुंबई येथून केवळ तीन विमाने चालविण्यात येणार आहेत.

02 Jun, 21:47 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यूएसए मध्ये होणाऱ्या पुढील जी -7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले.

02 Jun, 21:45 (IST)

मुंबईत आज 49 मृत्यू आणि 1109 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; मुंबईत एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या आता 41986 झाली आहे. शहरात मृतांचा आकडा 1368 झाला आहे.

02 Jun, 21:11 (IST)

सध्या अलिबाग जवळ निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. उद्या दुपारी हे वादळ मुंबईमध्ये दाखल होईल, अशात सध्या शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये जवळजवळ प्रत्येक भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस चालू आहे. 

02 Jun, 20:47 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 2287 रुग्ण आढळले तर 103 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 72,300 वर पोहचला आहे.

02 Jun, 20:30 (IST)

अंतिम वर्षांच्या परीक्षाांबाबातचा निर्णय कायद्यानुसार होणार असल्याचे  राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. या परीक्षांबाबत भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र सुद्धा पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ परीक्षांवरुन पुन्हा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

02 Jun, 20:15 (IST)

निसर्ग चक्रीवादळच्या काळात सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Load More

महाराष्ट्र, गुजरातसारखी राज्य एकीकडे कोरोना व्हायरसचा सामना करत असताना आता भारतीय हवामान खात्याने 'निसर्ग' चक्रीवादळाचा अलर्ट जारी केलेला आहे. IMD च्या अंदाजानुसार उद्या (3 जून) च्या संध्याकाळी किंवा रात्री महाराष्ट्राच्या उत्तर भागात तर गुजरातच्या दक्षिण भागाजवळ हे चक्रीवादळ धडकणार आहे. या वादळाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर होणार असून मुंबई सह आजुबाजूच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तास मासेमार्‍यांनी किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 70 हजाराचा टप्पा पार केला आहे. मुंबई शहरात देखील 40 हजारांच्या पुढे रूग्णसंख्या गेली आहे. दरम्यान राज्यात 37 हजारांपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जागतिक क्रमावारीमध्ये भारत आता कोरोनाबाधित रूग्णांच्या क्रमवारीमध्ये 7व्या स्थानी आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सध्या कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. किनारपट्टीवर एनडीआरफची टीम सज्ज आहे.


Show Full Article Share Now