भारतात आतापर्यंत 1.4 कोटी जणांना कोरोनाची लस देण्यात आली; 19 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Feb 19, 2021 11:24 PM IST
महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह आहे. यंदा कोरोना वायरसमुळे राज्यात शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यात पुन्हा झपाट्याने कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता पसरली आहे. मात्र प्रत्येकाने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान आज शिव जयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगड, शिवनेरी वर खास शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पडणार असून नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई सह महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा कोरोना झपाट्याने पसरत असल्याने नियमावली कडक करण्यात आली आहे. असिम्टमॅटिक रूग्ण अधिक असल्याने नागरिकांना वारंवार हात स्वच्छ धुणं, वैयक्तिक स्वच्छता राखणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्कचा वापर करणं हे नियम कटाक्षाने पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान सध्या महाविकास आघाडीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रसाशन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह एनसीपी नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहून पुन्हा सारी यंत्रणा अलर्ट मोड वर गेली आहे.