नवी दिल्लीत 2877 नव्या COVID-19 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या 49,979 वर ; 18 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Jun 18, 2020 11:56 PM IST
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याचा आकडा आता 354056 वर पोहचला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियमात शिथीलता जरी आणल्यानंतर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. यापूर्वीच कोरोनाच्या रुग्णांची अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा पार पडली. आता या पुढे देशात लॉकडाऊन लागू करणार नसून अनलॉकची प्रक्रिया पार पडणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संकटानंतर भारत आणि चीन मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्व लद्दाख मधील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात देशाचे 20 जवान शहीद झाले. यावरून नरेंद्र मोदी यांनी भारताला शांतता हवी असून चिथावणी दिल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल अशा इशारा चीनला देण्यात आला आहे. तसेच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे ही मोदी यांनी म्हटले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसेच पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. तर आज पेट्रोल किंमतीत 0.53 पैशांची वाढ होऊन 77.81 रुपये झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीत 0.64 पैशांची वाढ झाली असून 76.43 प्रति लीटर झाले आहे. या किंमती दिल्लीसाठी असणार आहेत.