पुण्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुण्यात एकही रुग्ण वाढता कामा नये, यासाठी आठ दिवस कडक लॉकडाउनशिवाय पर्याय नाही. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर, कडक धोरण अवलंबावे. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील, असे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ट्वीट- 

 

हरियाणा येथे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या परिचारिकेच्या 20 महिन्यांचा बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बाळाला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, परिचारिकेच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळेच तिच्या बाळाला कोरानाचा संसर्ग झाल्याचे शक्यता व्यक्त केली जात आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातले असताना मध्य प्रदेशातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या मध्य प्रदेशात एकूण 1 हजार 402 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 127 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. एएनआयचे ट्विट-

  

नागपूर येथे कोरोनावर उपचार घेऊन डिस्चार्ज देण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमाचे उल्लंघन केल्याने पुन्हा क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नवी मुंबईत मोठ्या संख्येने फ्लिमिंगोचे आगमन झाले आहे.

गुजरात येथे आज 5 जणांना नव्याने मृत्यू झाल्याने बळींची आकडा 53 वर पोहचला आहे.

मुंबईत आज सर्वाधिक म्हणजेच 184 कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेले सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबड यांची एनआयए कोठडी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं 25 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

ओडिशा येथे 58 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 61 वर पोहचला आहे.

छत्तीसगढ येथे नक्षलवाद्यांनी रस्त्यावरील 7 गाड्या जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.

Load More

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चढा असणारा कोरोनाबाधितांचा आकडा आता हळूहळू नियंत्रणात येण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेने मागील काही दिवसांपासून औषधोपचार पद्धाती आणि इतर प्रशासकीय स्तरावरही अनेक बदल केल्याने आता महाराष्ट्रातील कोरोना फैलावाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र अशातच आता भारतीय नौदलामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर झालं आहे. मुंबईमध्ये नौदलाच्या तळावरील सुमारे 15-20 जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.

काल दिवसभरामध्ये महाराष्ट्र राज्यात 118 नवे रूग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या 3320 वर पोहचली आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 14 हजारांच्या जवळ पोहचली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

मुंबई, महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण आता कमालीच घटलं आहे. काही दिवसांपूर्वी अवघ्या 2 दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत होती. मात्र आता हा दर अंदाजे 6 दिवसांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे देशामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित असणार्‍या महाराष्ट्रात हा दर मंदावत असल्याने आता देशाला मोठा दिलासा मिळाला आहे.