देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस वाढवले आहेत. तसेच नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात काही सुविधा नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र विविध क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती पाहून त्या सुविधा सुरु केल्या जाणार आहेत. मात्र नागरिकांनी गर्दी करणे टाळावे असे आवाहन ही करण्यात आले आहे. त्याचसोबत सरकारने विविध धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र पुढील आठवड्यापासून रमजान महिना (Ramadan Month) सुरु होणार असल्याने मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण आणि इफ्तार असे धार्मिक कार्यक्रम करावेत असे आवाहन अल्पसंख्यांक विकास विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनांवर निर्बंध आणले आहेत.
मुस्लिम बांधवांनी सर्व धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम समाजातील धर्मगुरु, स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्यामार्फत आवाहन व जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.(राज्य सरकारची मोठी घोषणा: लॉकडाउनच्या काळात राज्यातील 12 लाख 20 हजार बांधकाम मजुरांना मिळणार आर्थिक मदत)
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत- अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन pic.twitter.com/fuLp8iPPh4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 18, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्राची ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 14 हजारापेक्षा अधिक आहे.