Earthquake In Delhi: राजधानी दिल्ली व गुडगाव परिसरामध्ये आज रात्री भूकंपाचे धक्के जाणवले; 17 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Dec 17, 2020 11:54 PM IST
मुंबई उच्च न्यायालयाने कांजुरमार्ग मेट्रो कारशेड कामास आणि जमीन हस्तांतरणास स्थगिती दिली. त्यामुळे आता कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच याच मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. विरोधकांचे म्हणने असे की, मेट्रो कारशेड मूळ ठिकाणी म्हणजे आरे वसाहतीत करावे. तर, सत्ताधारी महाविकासआघाडीचे म्हणने असे की, मेट्रो कारशेड हे कांजूरमार्ग येथे व्हावे कारण या ठिकाणी मेट्रो 3, 6 आणि पाच, सहाचे कारशेडही येथेच करता येईल. त्यामुळे सर्वच कारशेड एकाच ठिकाणी उभारता येतील.
दुसऱ्या बाजूला महागाई कमी करण्याचे अश्वासन दिलेल्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला गस सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडर गॅस दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने सर्वासामान्यांवर गॅस दरवाढीचा भार पडत असल्याचे सांगितले जात आहे. नव्या दरपत्रकानुसार विनाअनुदानित गॅस सिलिंडर 644 रुपये होता त्यात वाढ होऊन तो 694 रुपये झाला. तत्पूर्वी हेच दर 1 डिसेंबरला 50 रुपयांनी वाढले. त्यानंतर आता पुन्हा सुरु असलेल्या महिन्यातच हे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे या दरात सुमारे 100 रुपयांची एकूण वाढ झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असा सामना अद्यापही कायम आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून कायम आहेत. जाचक ठरणारे कृषी कायदे रद्द करावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत सुरु केलेल्या वाटाघाटीही अध्याप यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे गुंता अधिक वाढला आहे. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आदीमधून सावरु पाहात असलेल्या मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा घसरला आहे. कमी झालेले तापमान, वाहणारे कोरडे वारे आणि लॉकडाऊननंतर शहरात वाढलेली वाहनांची संख्या आदींचा एकत्रीत परिणाम शहरातील हवेवर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा कमालीचा घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे अद्यापही धोका टळला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील बातम्या, घडामोडी यांबाबतचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.