मुंबई: कलिना परिसरात एका महिलेवर थुंकून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वराला पकडण्यात पोलिसांना यश; 17 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Apr 17, 2020 11:14 PM IST
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. देशातीतल कोरोना बाधितांची संख्या 12 हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात 3 हजार पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून एका दिवसात वाढणाऱ्या रुग्णांचा आकड्यात घट होणे ही दिलासादायक बाब आहे, असल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
देशातील एकूण कोरोना चाचणीचा विचार केल्यास महाराष्ट्रात २० टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वाधिक 80 टक्के चाचण्या एकट्या मुंबईमध्ये करण्यात आल्या आहेत. राज्यात मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात अजून संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे. परंतु, रुग्णाचा कोणताही प्रवास नसतानाही संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलगंणा आदी राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 1640 वर पोहोचली आहे.