App च्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर अपहरण, मध्य प्रदेशात जाऊन 50 हजार रुपयांना केली मुलीची विक्री
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकने मध्य प्रदेशात राहणाऱ्या एका राजीव गर्ग नावाच्या एका व्यक्तीला मुलीचे अपहरण केल्यानंतर तिची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेची आरोपीच्या ताब्यातून सुटका केली आहे. सध्या पोलिसांकडून मुलीची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा तपास करत आहेत. आरोपी राजीव गर्ग याने राम मोहन याला 50 हजार रुपयांना मुलीला विकले.(Assam Child abuse: आधी मोठ्या लाडाने घेतले दत्तक, मात्र नंतर मारहाण करत ठेवलं डांबून, वाचा काय आहे प्रकरण)

दिल्ली पोलिसांच्या मते, रणहौला परिसरातील एका परिवारातील आपली 16 वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. परिवाराने पोलिसांना असे म्हटले की, मुलीने आपल्या मित्राला भेटायला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र परत ती घरीच आली नाहीच. पोलिसांनी जेव्हा तो क्रमांक ट्रेस केला असता तो मध्य प्रदेशात असल्याचे दिसून आले. तपासादरम्यान, पोलिसांना हे सुद्धा कळले आहे की, ज्या दिवशी पीडिता घरातून बेपत्ता झाली तेव्हा तो क्रमांक दिल्लीत अॅक्टिव असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी ह्युमन इंटेलिजेंसच्या माध्यमातून व्यक्तीच्या घरावर छापेमारी केली आणि राजीव गर्ग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

चौकशीवेळी त्याने असे म्हटले की, मुलीला त्याने आपला भाडेकरुन राम मोहन याला 50 रुपयांना विक्री केले. त्यानंतर पोलिसांकडून छापेमारी करत पीडितेला आरोपीच्या घरातून सोडवले. दिल्ली पोलिसांच्या मते आरोपी राजीव गर्ग याने अपहरण केल्यानंतर काही दिवस पीडितेवर बलात्कार सुद्धा केला. त्यानंतर तिची 50 हजार रुपयांना विक्री केली.(Tamil Nadu: धक्कादायक! 14 वर्षीय मुलगी झाली 5 महिन्यांची गर्भवती, प्रियकर-काकासह 6 जणांनी केला बलात्कार)

दिल्ली पोलिसांनी असे म्हटले की, पीडितेने एका अॅपवर अकाउंट सुरु केले होते. याच अॅपवर आरोपी राजीव गर्ग याने एका मुलीच्या नावे आपले सुद्धा अकाउंट सुरु केले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र जेव्हा पीडिताला राजीव गर्ग याच्याबद्दल खरे कळले की अकाउंट हे मुलीचे नसून मुलाचे आहे तर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. मात्र राजीव याने पीडितेला दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन भेटण्यासाठी त्याने तिला राजी केले. जेव्हा पीडिता राजीव याला भेटण्यासाठी मधुबन चौक येथे पोहचली असता त्याने तिचे अपहरण केले. तर मध्य प्रदेशातील भिंड येथे जाऊन तिच्यावर काही दिवस बलात्कार केल्यानंतर आपल्या भाडेकरुला 50 हजार रुपयांना विकले. पोलिसांकडून राम मोहन याचा शोध घेतला जात आहे.