Assam Child abuse: आधी मोठ्या लाडाने घेतले दत्तक, मात्र नंतर मारहाण करत ठेवलं डांबून, वाचा काय आहे प्रकरण
Representational Image (File Image)

देशात लहान मुलांवरील अत्याचार (Child abuse) केल्याच्या घटना वाढत आहेत. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर या गुन्ह्यातील आरोपीला शिक्षाही झाल्या आहेत. दरम्यान अशीच एक आसाममधील (Assam) बाल अत्याचाराची घटना समोर आली आहे. आसामच्या (Assam Child abuse) डिब्रूगड (Dibrugarh) जिल्ह्यात एका 13 वर्षाच्या मुलाला दत्तक पालकांच्या (adoptive parents ) हातून भयावह अत्याचार सहन करावा लागला आहे. आपल्या जन्माच्या आई-वडिलांसमोर त्याच्या भयानक प्रसंगांचे वर्णन केल्यावर हे कृत्य समोर आले.  यानंतर पोलिसांना (Assam Police) कळविण्यात आले आणि दत्तक पालकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुशिक्षित जोडप्याकडूनच असे कृत्य घडल्याने त्यांच्यावर टीकांचा वर्षाव होत आहे.

इंद्रजित हंडिक आणि त्यांची पत्नी अनुराधा बरुआ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हंडीक हा डिब्रूगड विद्यापीठाचा (Dibrugarh University) कर्मचारी आहे. तर पत्नी डिब्रूगडमधील एका शाळेत शिक्षिका आहे. हे जोडपे डिब्रूगड विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जिल्ह्यातील नाहरोनी भागातील 13 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी जोडीने मुलावर लाठी-वार केल्याचा आरोप केला जात होता. त्यांनी बर्‍याच दिवसांपासून त्याला वॉशरूममध्ये बंद ठेवले होते. अलीकडेच त्याने त्याच्या खऱ्या पालकांना भेट दिली होती. त्यांच्यासमोर त्याली दिला जाणारा त्रास सांगितला.  त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात. आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या जोडप्यावर बाल कामगार कायद्याच्या कलम 240, 323, 344, 606 आर / ड अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही डिब्रूगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी कायदेशीररित्या मुलाला दत्तक घेतले की नाही याचा आम्ही तपास करीत आहोत. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे टीओआयच्या अहवालात एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशातील एका 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती. दरम्यान याआधी भाजी चोरी केल्याच्या आरोपाखाली कानपूरमधील मागे एका मुलाला मारहाण आणि हात बांधून घेतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्थानिक पोलिसांनी लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केले आहेत. आतापर्यंत पीडितेची ओळख पटू शकली नाही. परंतु पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यांची ओळख व्हायरल व्हिडिओच्या मदतीने घडली होती.