Tamil Nadu: धक्कादायक! 14 वर्षीय मुलगी झाली 5 महिन्यांची गर्भवती, प्रियकर-काकासह 6 जणांनी केला बलात्कार
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

Tamil Nadu: तमिळनाडू मधील पोल्लाच्चि येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 14 वर्षीय मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याची बाब उघडकीस आली. ही बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. घरातील मंडळींनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तपासात असे समोर आले आहे की, 14 वर्षीय मुलीसह 6 जणांपेक्षा अधिक जणांनी तिचे लैंगिक शोषण केले आहे. खरंतर ही अल्पवयीन मुलीचे एका 16 वर्षीय मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. त्यावेळी प्रियकराने तिचे लैंगिक शोषण केलेच पण त्याच्या अन्य पाच मित्रांनी सुद्धा तिच्यासोबत तोच प्रकार केला. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, पीडिता 10 वी इयत्तेची विद्यार्थिनी आहे आणि बहुतांश वेळ ती घरात एकटीच असायची. तिचे आई-वडील मजूरीचे काम करतात. मुलीचे शेजारी राहणाऱ्या एका 11 वी मधील मुलासोबत अफेअर सुरु होते. तेव्हापासून तिचे तो शारिरीक शोषण करत होता. पुढे पोलिसांनी असे म्हटले की, प्रियकराव्यतिरिक्त पाच मित्रांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुलीवर विविध ठिकाणी बलात्कार केला. या मध्ये मुलीचा काका आणि पाच शेजाऱ्यांचा समावेश आहे. मुलीला सोमवारी पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले.(Uttar Pradesh: अवघ्या 9 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु)

पोलिसांचे असे म्हणणे आहे की, मुलीवर बलात्कार करणाऱ्यांपैकी एक तिचा प्रियकर, 17 वर्षीय वॉल पेटिंग करणारा मुलगा, एस नागराज, टी प्रवीण आणि वी मुथुमुरन यांच्यासह तिचा 31 वर्षीय काका एम महाराजोथी यांनी तिच्यावर बलात्कार केला.या सर्वांनी तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. त्याचसोबत एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.