झारखंडमध्ये आज 316 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 4,562 वर; 15 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jul 15, 2020 11:49 PM IST
सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) 10 वी चा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ व संसाधन मंत्री रमेश पोखरियाल (HRD minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी याबाबत काल माहिती दिली आहे. आज (15 जुलै) सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर cbseresult.nic.in वर निकाल पाहायला मिळेल.
दुसरीकडे राजस्थान मधील सत्ता संघर्ष कालपासून बराच चर्चेत आहे. सचिन पायलट यांना काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हटवले आहे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा काढून घेतले आहे. यानंतर भाजप तर्फे पायलट यांना ऑफर देण्यात आली आहे. मात्र पायलट यांची पुढील भूमिका नेमकी कशी असणारआणि त्यांना काँग्रेस पक्षातील किती आमदार पाठिंबा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या सध्या 9,06,752 इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट 63.2 टक्के इतका असल्याने अजूनही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जातेय. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा कालच्या अपडेटनुसार सध्या 2,67,665 वर पोहचला आहे. मुंबईत मात्र काल पहिल्यांदा 1000 हुन कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
आज महाराष्ट्र व गोव्यात म्हणजेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचे अंदाज आहेत. हवामान खात्याकडून मुंबईमीठाणे , रायगड, पालघर सहित किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.