Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या हस्ते पहिल्या जेंडर पार्कचे उद्घाटन; 14 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Feb 14, 2021 11:28 PM IST
A+
A-
14 Feb, 23:28 (IST)

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या हस्ते आज कोझीकोड येथे पहिल्या जेंडर पार्कचे उद्घाटन झाले आहे. ट्विट-

 

14 Feb, 22:43 (IST)

जम्मू-काश्मीर येथे नाका तपासणी दरम्यान बडगाम पोलिस आणि भारतीय सैन्याने 2 दहशतवाद्यांना अटक केले. हे लष्कर ए तोयबा आणि तहरीक उल मुजाहिद्दीन संघटनेतील आहेत. यांच्याकडून बॅनर, लेटर पॅड, ध्वज जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

14 Feb, 21:32 (IST)

पुणे विभागातील वनविभागाने अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव गावातून चार जणांना पॅंगोलिन शिकार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ट्विट-

 

 

14 Feb, 20:45 (IST)

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. उद्या सकाळी 12 वाजल्यापासून दिल्लीत 769 रुपये प्रति सिलेंडर असणार आहे. ट्विट-

 

14 Feb, 20:17 (IST)

पुलवामा हल्ल्याला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिंघू बोर्डरवर लोकांनी  कँडल मार्च केले

14 Feb, 20:06 (IST)

उत्तराखंड: पूर आलेल्या चमोली जिल्ह्यातील रैणी गावातील नागरिकांसाठी ये-जा करण्यासाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला आहे. ट्विट- 

 

14 Feb, 19:07 (IST)

नवी मुंबई पोलीस ठाण्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून एका पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्विट-

 

14 Feb, 18:33 (IST)

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे गुवाहाटी विमानतळावर आगमन झाले असून उद्या ते राज्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ट्विट-

 

14 Feb, 18:18 (IST)

आंध्र प्रदेशमध्ये आज आणखी 55 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 117 जणांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. ट्विट

 

14 Feb, 17:29 (IST)

टूलकिट गूगल डॉकचे संपादक दिशा रविला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ट्विट-

 

Load More

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांपूर्वी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात तब्बल 40 जवान शहीद झाले होते. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे चोख उत्तर पाकिस्तानाला दिले. रात्री 3 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये 100 किमी आत घुसून बालाकोट येथील जैश-ए- मोहम्मद च्या दहशतवादी छावण्यावंर बॉम्बहल्ले केले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु. आज त्यात हलकासा सुधार दिसत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 'very poor' ते  'poor' कॅटेगरीपर्यंत पोहचली आहे. मात्र दिल्लीतील हवेची गुणवत्ता अद्यापही 'very poor'अशीच आहे, अशी माहिती हवा गुणवत्ता व हवामान अंदाज व संशोधन प्रणाली यांच्याकडून देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आज सलग 6 व्या दिवशी देखील वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 0.29 रुपयांनी वधारले असून दिल्लीत आज 88.73 रु. प्रति लीटरने पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेलचे दर 0.32 रुपयांनी वाढले असून 79.06 रु. प्रति लीटर इतके झाले आहेत.


Show Full Article Share Now