Coronavirus In Maharashtra: राज्यात आज 6,497 नवे कोरोना रुग्ण, 193 मृत्यू; कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,60,924 वर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra:  महाराष्ट्रात आज, 13 जुलै च्या दिवसभरात 6,497 ,कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, याशिवाय 4,182 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून 193 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार राज्यात आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,60,924 इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आजवर यातील 1,44,507 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत तर 10,482 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य आरोग्य विभातर्फे माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहेत, मात्र मुंबईच्या (Mumbai) बरोबरीने पुणे (Pune), ठाणे (Thane),औरंगाबाद (Aurangabad) , रायगड (Raigad) येथील कोरोना रुग्णाची आकडे सुद्धा वाढत आहेत. परिणामी या जिल्ह्यात पुढील आठवडाभर लॉकडाऊन (Lockdown)  जारी करण्यात आले आहे. Coronavirus In Mumbai: मुंबईत आज 1174 नवे कोरोना रुग्ण,47 मृत्यू ; 13 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दुसरीकडे मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी सांगितले आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांच्या वर गेला आहे. तर, रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षाही जास्त आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल, त्यामुळे 100 टक्के लॉक डाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता नाही असेही पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 17 हजार 895 नमुन्यांपैकी 2 लाख 54 हजार 427 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. तर राज्यातील मृत्युदर 4. 11टक्के इतका आहे.