लॉकडाऊनच्या काळात दीड लाखाहून अधिक नागरिकांचे घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग करण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ट्वीट- 

  

आसाममधील लग्नाला आलेल्या मेघालयातील 41 जणांवर कोरोनव्हायरस प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 10 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पुणे शहरात आज नवे 832 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 658, खासगी 153 आणि ससूनमधील 21 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 832 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 28, 357 इतकी झाली आहे.

पुणे शहरात आज नवे 832 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 658, खासगी 153 आणि ससूनमधील 21 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 832 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 28, 357 इतकी झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून परळी शहरात 15 ते 22 जुलै दरम्यान 'वाढदिवस सेवा सप्ताह' आयोजित केला आहे. शहरात कोरोना मदत केंद्र उभारून त्याद्वारे कोविड योद्ध्यांना आवश्यक साहित्य पुरविले जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून परळी शहरात 15 ते 22 जुलै दरम्यान 'वाढदिवस सेवा सप्ताह' आयोजित केला आहे. शहरात कोरोना मदत केंद्र उभारून त्याद्वारे कोविड योद्ध्यांना आवश्यक साहित्य पुरविले जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या बातमीने अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी सर्वत्र प्रार्थना केल्या जात आहेत. अशात पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी 'महामृत्युंजय यज्ञ' आयोजित केला होता.

आज जारी केलेल्या आदेशानुसार, कोरोना व्हायरस प्रकरणे आढळल्याने, मध्य दिल्लीतील भारतीय रेल्वेचे मुख्यालय असलेले रेल्वे भवन 14 व 15 जुलै रोजी बंद राहणार आहे.

राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या विधानसभेची (CLP) बैठक उद्या सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आर.एस. सुरजेवाला यांनी सचिन पायलट व सर्व आमदारांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली. या सर्वांनी यावे व परिस्थितीवर चर्चा करावी अशी इच्छा सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

नेपाळ चे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी एका प्रसंगी प्रभू श्री राम नेपाळी होते भारतीय नाही आणि खरं अयोध्या सुद्धा नेपाळ मध्ये आहे असे विधान केले आहे. नेपाळी माध्यमाच्या हवाल्याने ANI ने हे वृत्त दिले आहे.

Load More

राज्यातील कोरोणा स्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशभरात हेच चित्र आहे. कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव नियंत्रणा आणण्यासाठी सरकार शक्य तितका प्रयत्न करत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशात राज्यातील विद्यापीठांत अंतिम वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकार अनुकूल नाही. देशभरातील सहा राज्यांनी विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायला नकार दिला आहे. असे असले तरी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मात्र राज्य सरकारांना या परीक्षा घ्या म्हणून घोषा लावत आहेत. अशात परीक्षांचे नेमके कायहोणार याबाबत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष देशभरात ज्या ज्या ठिकाणी आघाडी, युती अथवा विरोधी पक्षांची सरकारे आहे त्या ठिकाणी सत्ताबदल करण्याच्या विचारात आहे. याची उदाहरणं कर्नाटक, मध्य प्रदेश, मिझोराम या राज्यांमध्ये या आधीच दिसली आहेत. आता राजस्थानमध्येही असेच काहीसे चित्र दिसण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोथ यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या काँग्रेस सरकारमध्ये सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. येथे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे इथे काय घडते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे जे काही परिणाम व्हायचे ते होताना दिसत आहे. कोरोना व्हायरस संकटात सरकारला लॉकडाऊन करण्याचा नर्णय घ्यावा लागला. ज्यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय, वाहतूक आणि अनेक महत्त्वाचे व्यवसाय ठप्प झाले. या निर्णयाचे परिणाम सुरुवातीच्या काळात फारसे जाणवले नाहीत. परंतू, आता त्याचे परिणाम चांगलेच दिसू आणि जाणवूही लागले आहेत. शाळा, महाविद्यालयांचे शुल्क वाढताना दिसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सरकारच्या उत्पन्नालाही मोठा फटका बसला आहे. इतका की राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी आता कर्ज काढावे लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना व्हायरस संकट, लॉकडाऊन, कोरोनावरील औषध, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, नागरी आरोग्य, वाहतूक, निसर्ग, संस्कृती, राजकारण, समाजकारण आणि लोकल ते ग्लोबल घटना, घडामोडींची ताजी नोंद पाहण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.