केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो रिस्टोर ; 12 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Nov 12, 2020 11:59 PM IST
बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये एनडीएला बहुमत मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जाऊन एनडीएला मिळालेल्या यशाचे तोंड भरुन कौतुकही केले. आता तिथे नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले जाईल. नीतीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरुन अनेक राजकीय पक्ष प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. नीतीशकुमार यांनी मुख्यमंत्री घ्यावे किंवा नाही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची लगबग उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून सुुर आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आजची (12 नोव्हेंबर) शेवटची मुदत आहे. तर उद्या (13 नोव्हेंबर) अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस 17 नोव्हेंर हा आहे. शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण 5 मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे. विधानभवनात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.
देश आणि राज्यात कोरोना व्हायरस संकटाची चर्चा कमी झाली असली तरी चिंता अद्यापही कायम आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि शक्य तितक्या प्रमाणावर काळजी घेण्याचे आवानह केले जात आहे. असे असले तरी नागरिक मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे या नागरिकांचे आणि कोरोनाचे पुढे काय होणार याबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.