नागपूर मध्यवर्ती कारागृहात 44 जणांना कोविड-19 ची लागण; 1 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Jul 01, 2020 11:45 PM IST
आज आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अत्यंत मंगलमय दिवस. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या वारीला साधे स्वरुप आले असले तरी विठुरायाप्रती भक्ती अबाधित आहे. आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्निक शासकीय महापुजा केली. यावेळेस पंढरपुरच्या विठू माऊली आणि रखुमाईच्या मंदिरातील वीणेकरी विठ्ठल बडे, अनुसया बढे हे मानाचे मानकरी ठरले.
दरम्यान भारतासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 566840 वर पोहचली असून 215125 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 334822 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 16893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप दाट असून मुंबई, ठाणे, पुणे या शहरांना कोविड-19 चा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत 10 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक आणि जिवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद राहणार आहे.