AI Art Delhi-Kolkata Snowfall (PC - Twitter/ @angshuman_ch)

AI Art Delhi-Kolkata Snowfall: भारतीय हवामान विभागाने सांगितले की, 4 ते 5 दिवसांत वायव्य भारतात पुढील तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. धुक्याच्या आच्छादनामुळे पंजाबचा बहुतांश भाग, हरियाणाचा काही भाग, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. आता चार ते पाच दिवस हीच स्थिती राहणार आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील 60 जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. भारतातील अनेक राज्यात थंडी वाढली आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का की, दिल्ली किंवा कोलकाता शहरांमध्ये बर्फवृष्टी झाली तर कसं वाटेलं?

अंगशुमन चौधरी नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने AI द्वारे जेनरेट केलेल्या काही प्रतिमा शेअर केल्या आहेत, ज्यात शहरे बर्फाच्या चादरीत झाकलेली आहेत. हे शहरं पूर्णपणे स्वप्नवत आणि जादुई दिसत आहे. अंगशुमन चौधरी नावाच्या कलाकाराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कोलकाता आणि दिल्लीचे अनेक फूट बर्फाने झाकलेले चित्रण करण्यासाठी कलाकृती तयार केली. दिल्लीच्या प्रसिद्ध इंडिया गेटचे आणि जुन्या दिल्लीच्या गल्लीबोळातील एक जुन्या गेटचे फोटो अत्यंत वास्तविक दिसत आहेत. बर्फात झाकलेली दोन्ही चित्रे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी वाटत आहेत. (हेही वाचा - MP High Court कडून 'ताजं पनीर' न विकण्याचा आरोप असलेल्या दुकानदाराला अंतरिम जामीन मंजूर)

अंगशुमन चौधरी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "मुसळधार हिमवर्षाव दरम्यान दिल्ली कशी दिसेल, नवीन आणि जुनी? मी नेहमीच असा विचार केला आहे. आता, AI ने मला ते दृश्यमान करण्यात मदत केली."

कलाकाराने आणखी दोन छायाचित्रे शेअर केली ज्यात कोलकात्यात बर्फवृष्टी झाली. चित्रात बर्फाने झाकलेली ट्राम दिसत आहे. ही पोस्ट एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आली होती. अपलोड केल्यापासून, या पोस्टवर हजारहून अधिक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.