Narendra Modi Takes Oath as PM For Third Term

Narendra Modi Government Cabinet 3.0: नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. रविवारी, 9 जून 2024 रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 72 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मोदी 3.0 मध्ये काही नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे, यासोबतच अनेक जेष्ठ जुने नेतेही मंत्रिमंडळात आहेत. मोदी 3.0 च्या शपथविधी सोहळ्याचे देशातील मान्यवर, सामान्य नागरिकांसह परदेशी राष्ट्रप्रमुख आणि पाहुणेही साक्षीदार झाले.

4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या. तर एनडीएला एकूण 293 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीने 233 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी एनडीएने आपले बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 7 जून रोजी पीएम नरेंद्र मोदी यांची एनडीएचा गटनेता म्हणून निवडा करण्यात आली व आज नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

पहा पोस्ट- 

मोदींच्या यंदाच्या मंत्रीमंडळात एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यापैकी 30 कॅबिनेट मंत्री आहेत, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत आणि 36 राज्यमंत्री आहेत. (हेही वाचा: Narendra Modi Takes Oath as PM For Third Term: देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पदभार स्वीकारणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांची यादी-

राजनाथ सिंह

अमित शहा

नितीन गडकरी

जेपी नड्डा

शिवराज सिंह चौहान

निर्मला सीतारामन

सुब्रह्मण्यम जयशंकर

मनोहर लाल खट्टर

एचडी कुमारस्वामी (जेडीएस) नेते

पियुष गोयल

धर्मेंद्र प्रधान

जीतन राम मांझी (एचएएम नेते)

लालन सिंग (जेडीयू) नेते

सर्बानंद सोनोवाल

वीरेंद्र कुमार

किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी नेते)

प्रल्हाद जोशी

जुएल ओरम

गिरीराज सिंह

अश्विनी वैष्णव

ज्योतिरादित्य सिंधिया

भूपेंद्र यादव

गजेंद्रसिंग शेखावत

अन्नपूर्णा देवी

किरेन रिजिजू

हरदीप सिंग पुरी

मनसुख मांडविया

जी किशन रेड्डी

चिराग पासवान (लोजप नेते)

सीआर पाटील

राव इंद्रजित सिंग

जितेंद्र सिंग

अर्जुन राम मेघघवाल

प्रतापराव गणपतराव जाधव

जयंत चौधरी (RLD प्रमुख)

जितीन प्रसाद

श्रीपाद येसो नाईक

पंकज चौधरी

कृष्ण पाल

रामदास आठवले

रामनाथ ठाकूर

नित्यानंद राय

अनुप्रिया सिंग पटेल

व्ही सोमन्ना

चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी खासदार)

एसपी सिंग बघेल

शोभा करंदलाजे

कीर्तीवर्धन सिंग

बीएल वर्मा

शंतनू ठाकूर

सुरेश गोपी

एल. मुरुगन

अजय तमटा

बंदी संजय कुमार

कमलेश पासवान

भगीरथ चौधरी

सतीशचंद्र दुबे

संजय सेठ

रवनीत सिंग बिट्टू

दुर्गा दास उईके

रक्षा निखिल खडसे

सुकांता मजुमदार

सावित्री ठाकूर

तोखान साहू

राजभूषण चौधरी

भूपती राजू श्रीनिवास वर्मा

हर्ष मल्होत्रा

निमुबेन बांभनिया

मुरलीधर मोहोळ

जॉर्ज कुरियन

पवित्र मार्गारीटा

दरम्यान, 1962 नंतर पहिल्यांदाच एखादे सरकार आपले दोन कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत. मोदींपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 मध्ये तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.