Narendra Modi Takes Oath as PM For Third Term: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह मंत्रिमंडळात सामील मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. या सोहळ्याला देश-विदेशातील जवळजवळ 8,000 लोक उपस्थित होते. तत्पूर्वी मोदींनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली.
मोदी 3.0 मध्ये अनेक जुन्या मंत्र्यांसह नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नितीन गडकरी यांना शपथ दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन, एस.जयशंकर, मनोहर लाल, एचडी कुमार स्वामी यांनी शपथ घेतली. नरेंद मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी, प्रताप राव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांची नावे समाविष्ट आहेत.
पहा व्हिडिओ-
Narendra Modi takes oath for the third consecutive term as the Prime Minister pic.twitter.com/cycMOll02d
— ANI (@ANI) June 9, 2024
#WATCH | Narendra Modi takes oath for the third consecutive term as the Prime Minister pic.twitter.com/LA1z6QF7iX
— ANI (@ANI) June 9, 2024
रंजक वस्तुस्थिती अशी आहे की 1962 नंतर पहिल्यांदाच एखादे सरकार आपले दोन कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत. मोदींपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 मध्ये तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. चहाच्या दुकानातून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या 14व्या पंतप्रधानापर्यंत पोहोचला. दामोदरदास मूलचंद मोदी आणि हिराबेन मोदी यांच्या पोटी जन्मलेल्या नरेंद्र मोदींचे शालेय शिक्षण वडनगरमध्ये झाले. नरेंद्र मोदी 1972 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये सामील झाले. यानंतर, 1987 मध्ये ते पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) भाग बनले. केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर, मोदींनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व 2014 पर्यंत ते या पदावर होते. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा आणि 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तिसऱ्या कार्यकाळात मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य ठेवले आहे.