पाकिस्तानातून आलेल्या 23 नागरिकांना मिळाले भारतीय नागरिकत्व
India-Pak (Getty Image)

महाराष्ट्रतील  (Maharashtra) शहराचे  गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील (Ranjeet Patil) आणि  ग्रामीण भागातील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पाकिस्तानमधून (Pakistan) भारतात (India) स्थलांतरीत अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना भारताचे नागरिकत्व (Indian Citizenship) देण्यात आले आहे. याआधी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आणि नंतर भारतात स्थलांतर होणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील लोकांना नागरिकत्व देण्याचा अधिकार केंद्र सरकारने (Central Govrnment) राज्य सरकारला (State Government) प्रदान केला आहे.

या निर्णयामुळे जळगाव, औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर येथील जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना याचा अधिक फायदा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. गृह राज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील म्हणाले की, पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी विनंती केली होती. आज केंद्र सरकारने यांची मागणी मान्य करत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. हे देखील वाचा- जैन धर्मीय असल्याचे कारण देत मासे, मटण विक्रीसाठी गाळे बांधण्यास कंत्रटदाराचा नकार; मुंबई महापालिका काय कारवाई करणार?

पाटील म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने अधिक आनंद होत आहे. अशा नागरिकांना भारतीय नागरिकत्व देताना माजी आमदार गुरमुख जगवाणी, उपसचिव व्यंकटेश भट आणि उपसचिव अजितराव यांच्या उपस्थित ही प्रक्रिया पार पाडली.