Mumbai, February 8: भारताने प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे आणि व्यापक लसीकरण मोहिमेद्वारे, कोविड-19 संसर्गास बराच काळ रोखण्यात यश मिळवले आहे. कोरोनाचे रुग्ण हे आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहेत. दरम्यान, मुलांमध्ये असामान्य परंतु तितक्याच धोकादायक मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MIS-C) चा धोका वाढला आहे. मुंबईस्थित सरकारी जेजे हॉस्पिटलमध्ये गेल्या 60 दिवसांत एमआयएस-सीची पाच प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये एका नवजात बालकाचा समावेश आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. लवकरात लवकर निदान आणि उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. अहवालात असे म्हटले आहे की, या आजारात ताप आणि पुरळ येते. जेजे डीन डॉ. पल्लवी सापले म्हणाल्या, "रुग्णालयातील केसेस दाखवतात की, कोरोनाची प्रकरणे लक्षणीयरीत्या कमी झाली असली तरीही कोविड-19 चा धोका आणखी टळला नाही. MIS-C हा आजार किती जीवघेणा आहे याबद्दलचे संशोधन आणखी सुरु आहे"
मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम म्हणजे काय?
मल्टीसिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MIS) ही COVID-19 शी संबंधित एक दुर्मिळ परंतु गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, डोळे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अवयवांसह शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येते. हा आजार लहान मुले (MIS-C) आणि प्रौढांना (MIS-A) प्रभावित करू शकते. एमआयएस-सी पहिल्यांदा यूकेमध्ये एप्रिल 2020 मध्ये आढळला होता