BJP Share 2024 Plan Through Video: आगामी 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. 2024 च्या निवडणूकीसाठी भाजप (BJP) ने खास व्हिडिओ शेअर केला आहे. या भाजपचं पुढील ध्येय काय असेल? हे सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने आपल्या योजनेची झलकही दाखवली आहे. 'मुझे चलते जाना है...' असं शीर्षक या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
साडेचार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांची झलक दाखवण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान मोदींना कसे टार्गेट केले, हेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. 2014 आणि 2019 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास कसा होता, हेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. (हेही वाचा -Nobel Prize For PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? पॅनेल सदस्यांनी केलं भारताचं कौतुक)
व्हिडिओच्या सुरुवातीला पीएम मोदी पायऱ्या चढताना दिसत आहेत. 2007 च्या सुरुवातीला मोदी गुजरातचे CM झाले. त्यानंतर मोदी समोरच्या पायऱ्या चढतात. मोदी पायऱ्या चढत असताना सोनिया गांधी दिसतात. सोनिया यमराजाकडे बोट दाखवते. ज्या म्हशीवर यमराज बसले आहेत, तिच्यावर मृत्यूचा व्यापारी असा शिलालेख आहे. मणिशंकर अय्यर सोनिया गांधींसोबत चहाची किटली धरताना दिसत आहेत. ते 'चाय-चाय' म्हणत हसताना दिसत आहेत, पण मोदी किटली हातात घेतात आणि हसत निघून जातात.
मुझे चलते जाना है... pic.twitter.com/1NLvbV7L8y
— BJP (@BJP4India) March 14, 2023
व्हिडिओमध्ये काँग्रेस नेत्यांनी मोदींना रोखण्यासाठी आणखी प्रयत्न केले आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांकडे लक्ष न देता 2014 मध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले. यानंतरही मोदी पायऱ्या चढतात आणि 2019 मध्ये पंतप्रधान बनतात. यावेळी मोदी सरकारच्या योजना दाखवल्या जातात. व्हिडिओच्या शेवटी 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था दिसत आहे. यावरून मोदी सरकारचं पुढील टार्गेट भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्संची करणं हे असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.