PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

Nobel Prize For PM Modi: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारताने रशियाला अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून रोखले आहे. भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करताना, नॉर्वेजियन नोबेल समितीचे उपनेते असल तोजे यांनी गुरुवारी सांगितले की, जगाला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची गरज आहे. अण्वस्त्र वापरण्याचे परिणाम रशियाला लक्षात आणून देण्यासाठी भारताचा हस्तक्षेप खूपचं उपयुक्त ठरला आहे.

तोजे यांनी पुढे म्हटलं आहे की, भारताचे प्रतिनिधी आतापर्यंत कधीचं मोठ्या आवाजात बोलले नाहीत, भारताने आतापर्यंत कोणालाही धमकावत नाही. त्यांनी फक्त मैत्रीपूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला त्याची अधिक गरज आहे. (हेही वाचा -Parliament Budget Session 2023: राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ; कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब)

पीएम मोदी नोबेल पुरस्काराचे दावेदार -

नोबेल समितीच्या नेत्याने भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुकही केले. भारत हा शांततेचा वारसा आहे असे सांगून असल तोजे म्हणाले की, भारत महासत्ता बनणार आहे. पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे सर्वात विश्वासू नेते आहेत आणि ते निश्चितपणे जगात शांतता प्रस्थापित करू शकतात.

तथापी, तोजे यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला पुढे नेण्याचे काम करत नसून जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही काम करत आहेत. याचा मला आनंद आहे. जगाने भारताकडून शिकण्याची गरज आहे. भारत महासत्ता होणार हे निश्चित असल्याचा विश्वासही यावेळी तोजे यांनी व्यक्त केला.