Tight security arrangements In Delhi (फोटो सौजन्य -X/@DCP_SHAHDARA)

Republic Day 2025: देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) सोहळ्यादरम्यान अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था (Tight Security Arrangements) करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत 70 हून अधिक निमलष्करी दलाच्या कंपन्या (Paramilitary Companies) आणि 15 हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत, असे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. शहरात पोलिस आणि इतर सुरक्षा संस्था मॉक ड्रिल करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या मार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात 500 उच्च-रिझोल्यूशन कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. याशिवाय, परेडमध्ये सहभागी होणाऱ्यांना विशेष सुरक्षा स्टिकर्स दिले जाणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण शहरावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने लक्ष ठेवले जाईल. याशिवाय, ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर तज्ञ अधिकारी तैनात केले जातील. (हेही वाचा -Republic Day Tableau Parade 2025: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, 15 राज्यं, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश)

बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था -

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शहरात सहा स्तरीय सुरक्षा आणि तपासणी व्यवस्था करण्यात आली आहे. नवी दिल्ली जिल्ह्यात हजारो सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यात फेशियल रेकग्निशन सिस्टम (FRS) समाविष्ट आहे. दिल्ली पोलिस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (हेही वाचा -Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सज्ज; सुरक्षा पथकांचा जागोजागी चोख बंदोबस्त)

सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत बैठका -

तथापी, सुरक्षेची खात्री करण्यासाठी शहरात हॉटेल्स आणि मॉल्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. जास्त गर्दी असलेल्या भागात मार्ग सर्वेक्षण आणि दक्षता वाढविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना सुरक्षा योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.