Rainfall | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण देशातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुंबईत, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ मधील काही भागात आणि दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार मधील काही क्षेत्रात 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि गोवा मध्ये सुद्धा तुफान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेश मराठवाडा, आंध्र प्रदेशाच्या तटावर आणि उत्तर आंतरिक कर्नाटक, छत्तीसगढ, तेलंगणा, विदर्भ, आसाम आणि मेघालय येथए पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सून पोहचण्यापूर्वी भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि दक्षिण गोव्यासह विविध भागात तुफान पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापूर्वी दक्षिण पश्चिम मान्सून गुरुवारी ओडिशात पोहचला असून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळ्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत क्षेत्रातील हवामान खात्याने 12 ते 13 जून दरम्यान दिल्ली-एनसीआर मध्ये पाऊस आणि पंजाब आणि हरियाणातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.(Maharashtra Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, पुढील 48 तास राज्यात पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल; मुंबई हवामान खात्याची माहिती)

दरम्यान, भारतात जूनच्या शेवटी भारतात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत असून सप्टेंबर पर्यंत कायम राहतो. देश सुरळीत राखण्यात पावसाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण देशातील शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.