PM Narendra Modi, Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

मणिपूरमध्ये (Manipur) लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून (Terrorist attacks) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट (Tweet) करून मोदी सरकार देशाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. मणिपूरमध्ये शनिवारी झालेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या (Assam Rifles) बटालियनच्या कमांडिंग ऑफिसरसह पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल बिप्लब त्रिपाठी (Colonel Biplab Tripathi) यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी शोकही व्यक्त केला. हेही वाचा Manipur Attack: मणिपूरमधील आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ल्यातील जवानांचे बलिदान विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध होते की मोदी सरकार देशाचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. यासोबतच ते म्हणाले की, शहीद जवानांना माझी श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना. देश तुमचे बलिदान लक्षात ठेवेल.

म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चुरचंदपूर जिल्ह्यात ही घटना घडली.  आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्विक रिअॅक्शन टीममध्ये अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांसह ताफ्यात होते.