केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक (Union Cabinet Meeting) झाली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात यावर्षी देशात 100 अब्ज डॉलरचे उत्पादन झाले आहे. यासोबतच गेल्या वर्षी 11 अब्ज डॉलरच्या मोबाइलची विक्रमी निर्यात झाली होती. IT हार्डवेअर क्षेत्रासाठी 17,000 कोटी रुपयांच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना सहा वर्षांसाठी आहे. 2400 कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता असून 75000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, दूरसंचार उत्पादन क्षेत्रात 42 कंपन्यांना पहिल्या वर्षी 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची होती, त्याऐवजी 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानास मान्यता दिली आहे. हेही वाचा यूजी प्रवेशासाठी CUET सुरू केल्यामुळे इयत्ता 12वी स्तरावरील बोर्ड परीक्षा अनावश्यक होणार नाहीत, UGC चे अध्यक्ष जगदेश कुमार यांची माहिती
देशात 325 ते 350 लाख मेट्रिक टन युरियाचा वापर होतो. 100 ते 125 लाख मेट्रिक टन डीएपी आणि एनपीके वापरले जातात. 50-60 लाख मेट्रिक टन एमओपी वापरला जातो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत म्हणून मोदी सरकारने सबसिडी वाढवली, पण दर वाढले नाहीत. खरीप पिकांसाठी केंद्र सरकार खतांच्या किमतीत वाढ करणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे.