
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. बागेतील आंबे घेतल्या प्रकरणी तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. आंब्याच्या बागेची काळदी घेण्याची जबाबदारी दिलेल्या व्यक्तीने मुलांवर अत्याचार केले. तीन मुलांना झाडाला बांधले आणि त्यांना मारहाण केली. ओरडा ओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात आंबे कोंबले. (हेही वाचा-बापरे ! अंगावर झाडाची फांदी पडल्याने महिला गंभीर जखमी, पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ)
मिळालेल्या माहितीनुसार, चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पीप्रिया गुरु गोविंद राय गावात ही घटना घडली. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओर संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तीन मुलांना एका आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले आहे. मुलांना मारहाण करत आहे.
कितना क्रूर बाग मालिक है...बाग में पड़े आम उठाने के आरोप में 3 बच्चों को रस्सी से बांधा। वो शोर न मचा पाएं, इसलिए मुंह में आम ठूंस दिया। सोशल मीडिया में Video वायरल होने के बाद बाग मालिक सुदर्शन गिरफ्तार है।
📍जिला महाराजगंज, उत्तर प्रदेश pic.twitter.com/mR2MUIjBHZ
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) July 12, 2024
मुलांना मारहाण करण्यावेळीस स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मुलांना झाडावरून बांधून त्यांचावर अत्याचार केला आणि त्यांना धमकी देखील दिली. पुन्हा बागेत पाऊल ठेवलात तर याचे परिणाम वाईट होतील असं मारेकरूनी सांगितले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलांवर अत्याचार करण्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केले आहे.