Andhra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिर परिसरात दुर्घटना घडली आहे. मंदीर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (हेही वाचा- सौदी एअरलाइन्सच्या विमानाला आग, पेशावरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पाहा व्हिडीओ)
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला मंदिर परिसरात महिला दर्शन घेण्यासाठी जात होती. त्यावेळी अचानक एका मोठ्या झाडाची फांदी तुटून महिलेच्या अंगावर पडली. महिला बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळली. मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भाविकाने ही घटना फोनमध्ये कैद केली. महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ
A branch of tree fell on a women in Tirumala at Anjaneyaswamy Japali Kshetra. She is severely injured head and spinal,she's shifted to Hospital #Tirupati #Tirumala #Tree #Injured pic.twitter.com/v0kksio4NA
— Saravanan Journalist (@Saranjournalist) July 12, 2024
डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांच्या सांगण्याहून, परिसरात हवा जोरात आली होती त्यामुळे फांदी तुटली.