
Minor Girl Set Ablaze in UP's Ballia: देशभरासह राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक व संतपाजनक घटना समोर आली आहे. छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या एका विद्यार्थीनीस जीवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आपल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचेही हात भाजले गेले आहेत. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
पीडित तरुणी (वय, 15) शनिवारी (7 नोव्हेंबर) कोचिंग क्लासला जात असताना गाव गुंडांनी तिची छेड काढली. त्यावेळी पीडित तरुणीने त्यांचा विरोध केला. मात्र, तिच्यावर संतापलेल्या गाव गुंडांनी पीडित तरुणीच्या घरात घुसून तिला जिवंत पेटवून दिले. त्यावेळी आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडिल धावून आले. तसेच तिला वाचवताना त्यांचाही हात भाजला गेला. त्यानंतर पिडित तरूणीला वाराणसी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती होताच एसपी देवेंद्रनाथ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती इंडिया टूडे आपल्या वृतात दिली आहे. हे देखील वाचा- Kolhapur: इचलकरंजी येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर प्राणघातक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, पीडत क्लासला जात असताना आरोपी नेहमी तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या मागे-मागे जाऊन तिला त्रास देखील द्यायचा. एवढेच नव्हेतर, त्याचे म्हणणे न ऐकल्यास तिची जीवन उद्धवस्त करण्याची धमकही देत होता, असा आरोपी पिडिताच्या नातेवाईकांनी केला आहे.
याआधी उत्तर प्रदेशच्या देवरिया परिसरात एका तरुणीची छेड काढली होती. त्यावेळी तिचे वडील जाब विचारण्यासाठी गेले असताना आरोपीच्या नातेवाईकांनी त्यांना बेदम मारहाण केली. ज्यात पिडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.