Ministry of Railways: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; 1 जानेवारी 2020 पासून होणार मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

रेल्वे प्रशासनाने (Ministry of Railways) नवे वर्ष सुरु होण्याअगोदरच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2020 च्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू केले जाणार आहे. ज्यांनी काही दिवसाआधी तिकीट काढून ठेवले आहेत, अशा प्रवाशांना दिलासा मिळला आहे. त्यांना आधीच्या तिकीट दरातच रेल्वेतून प्रवास करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस आणि मेल गांड्याच्या (स्लीपर डब्बा) तिकीट दरात 2 पैसा प्रतिकिलोमीटर तर, एसी क्लास च्या तिकीट दरात 4 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ केली होती. मात्र, लोकल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

एएनआयचे ट्वीट-

भारतीय रेल्वेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वात सुरक्षित प्रदर्शन नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली होती. भारतीय रेल्वेने पहिल्या 6 महिन्यात कोणत्याही प्रवाशांचा मृत्यूची घटना घडली नाही. परंतु राष्ट्रीय वाहकांच्या सातव्या वेतन संवेदनांशी संबंधित क्रियान्वयनचे आर्थिक संकट उद्भवू लागले आहे, अशी महिती रेल्वे बोर्डाच्या चेअरमन व्हि. के यादव यांनी दिली.