गोवा: नौदलाच्या MiG-29K लढाऊ विमानाला अपघात
File image of aircraft used for representational purpose | (Photo Credits: Getty Images)

नौदलाच्या MiG-29K या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. आज सकाळी गोव्यामध्ये हा अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी या विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलं होतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांकडून या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

एमआयजी 29 के या विमानाने रविवारी साडेदहाच्या सुमारास हवेत झेप घेतली होती. दरम्यान, काही वेळातचं विमानाचा अपघात झाला. विशेष म्हणजे या विमानातील वैमानिक या अपघातातून बचावला आहे. अद्याप या अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही. (हेही वाचा - Maharashtra Budget Session 2020: सोमवारपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन)

यापूर्वी अनेकदा लढाऊ विमानाचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एमआयजी 29 के या नौदलाच्या लढाऊ विमानाला अपघात होण्याची दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर महिन्यात नौदलाचे मिग 29 के फायटर जेट विमान सरावादरम्यान दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळले होते. विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले होते. त्यामुळे या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. 2018 मध्ये 3 जानेवारीला नौदलाच्या दाबोळी विमानतळावर मिग-29 के लढाऊ विमान कोसळून अपघात झाला होता.