Rajasthan Viral Video: राजस्थानमधील जोधपूर शहरात मेडिकलच्या पाच विद्यार्थ्यांच्या टोळक्याने दुधाच्या व्हॅन मालकावर जीवघेणा हल्ला करून त्याची लूटमार करून व्हॅन पळवली आहे. ही संपुर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना मथुरादास माथुराजवळ घडली. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. चोरी झालेली व्हॅन पोलिसांनी शोधून काढली आहे. (हेही वाचा- मुलींची छेडकाढणाऱ्यांना दोन रोडरोमियोंना तरुणींचा दणका, भररस्त्यात दिला चोप)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 14 जुलै रोजी पहाटे 4 वाजता ही घटना घडली. एमबीबीएस विद्यार्थ्याची टोळी रस्त्यावरून जात असलेल्या मिल्क व्हॅनला थांबवले. देवेंद्र सिंग देवडा यांच्या मालकीही व्हॅन आहे. विद्यार्थ्यांनी मिल्क व्हॅनशी गैरवर्तन केले त्याकडून पैसे लुटले आणि त्यानंतर मिल्क व्हॅन घटनास्थळावरून पळवून काढली. या घटनेनंतर व्हॅनचे मालक देवेंद्र यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत तीन आरोपींना अटक केले.
राजस्थान में डॉक्टरों ने लूटी मिल्क वैन
जोधपुर में कल सुबह मिल्क वैन लूटी गई। इस मामले में मेडिकल कॉलेज के 3 MBBS स्टूडेंट्स विकास विश्नोई, ओमप्रकाश जाट और महेश विश्नोई पकड़े गए हैं। दो स्टूडेंट्स फरार हैं। कहा जा रहा है कि खीर बनाने के लिए इन्होंने दूध लूटा था। pic.twitter.com/S5FXlXtBmE
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) July 15, 2024
पीडित व्यक्तीने सांगितले की, हल्लेखोरांनी मारहाण केली. वाहनातून दुधाचे २४ क्रेट लंपास केले आणि त्याचसोबत काही रक्कम देखील चोरली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आणि दोन जण फरार असल्यामुळे त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या तपासात व्हॅन पाल रोडवर आढळली. पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे. विकास विश्नोई, ओमप्रकाश जाट, महेश विश्नोई अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. हे आरोपी एम्स कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे.