Sambhajinagar Video: संभाजीनगर येथे दोन तरुण येणाऱ्या जाणाऱ्या तरुणींची छेड काढत होते. या घटनेनंतर संतापलेल्या तरुणींनी छेड काढणाऱ्या रोडरोमियोना चोप दिला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस स्थानक परिसरात ये -जा करणाऱ्या तरुणींची छेड काढायचे. काही दिवस असचं चालू होते. त्यानंतर संतापलेल्या तरुणींनी या छेड काढणाऱ्या तरुणांना भररस्त्यात चोप दिला. तरुणी दोन तरुणांना मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे आणि घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी पाहण्यासाठी परिसरात गर्दी केली. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. (हेही वाचा- पगार न दिल्याने आयटी कंपनीच्या संस्थापकाचे अपहरण, आठ तरुणांना अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)