MEA On Passport Verification: पासपोर्ट अर्जदारांच्या पोलीस पडताळणीमध्ये लागणारा वेळ कमी होणार
Indian Passport | Representational Image

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणीमध्ये लागणारा वेळ कमी करण्यासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे. यासाठी MEA राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न करत आहे. पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने जयशंकर म्हणाले की, त्यांचे मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करून आणि जागतिक गतिशीलता वाढवून पासपोर्ट देशाच्या विकासावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.  (हेही वाचा - Child Care Leave: प्रसूती रजेबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरोगसीद्वारे आई झाल्यास मिळणार सहा महिन्यांची बालसंगोपन रजा)

उत्तम पासपोर्ट सेवा देण्यासाठी मंत्रालयाने 440 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले आहेत. हे देशभरातील 93 पासपोर्ट सेवा केंद्र, 533 पासपोर्ट प्रक्रिया केंद्र आणि 37 प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांव्यतिरिक्त आहे. मंत्रालयाने परदेशातील 187 भारतीय मिशनमध्ये पासपोर्ट जारी करण्याची प्रणाली देखील एकत्रित केली असल्याचे जयशंकर यांनी केला.

पोलीस पडताळणीसाठी देशभरात सरासरी 14 दिवसांचा कालावधी आहे. तथापि, ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये mPassport पोलीस ॲप लाँच करण्यात आले आहे, तेथे पोलीस पडताळणीसाठी सरासरी पाच दिवसांपेक्षा कमी वेळ आली आहे. जयशंकर यांनी त्यावेळी सांगितले होते की, पोलिस पडताळणीचा कालावधी वगळून सामान्य पासपोर्ट काढण्यासाठी सरासरी सात ते 10 दिवस आणि तत्काळ पासपोर्टसाठी सरासरी एक ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. ते म्हणाले होते, "पासपोर्ट वेळेवर पाठवण्यात अर्जदारांच्या तपशीलांची पोलिस पडताळणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते."